1 thought on “Hello world!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

दि चिपळूण अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. चिपळूण

मुख्य कार्यालय : पटेल ट्रेड सेंटर, पहिला मजला, खेंड, दुर्गाळी, चिपळूण. ४१५६०५. रत्नागिरी.
फो. नं.: (०२३५५) २६१२७३, २६१०१८, फॅक्स  : (०२३५५) २६११३५.
E-mail : oldaccounts@chiplunurbanbank.com | Website : www.chiplunurbanbank.com


-:: लॉकर धारकांना जाहीर आवाहन ::-

रिझर्व्ह बँकेचे दि.18.08.2021 परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार बँकेच्या सर्व शाखांच्या लॉकरधारकांनी बँकेसोबत नविन लॉकर करार (Agreement) करणे आवश्यक आहे. बँकेच्या अनेक लॉकरधारकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदलला असल्यामुळे त्यांचेशी संपर्क होत नाही.

तरी ज्या लॉकर धारकांनी अदयापही आपला नविन लॉकर करार (Agreement)  केला नाही त्यांना आवाहन करणेत येत आहे की, लॉकर संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या  मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेसाठी बँकेच्या सर्व शाखानिहाय लॉकर धारकांनी आपले लॉकर असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवीन लॉकर करार (Agreement)  करून घ्यावे.

दि.:- 07.06.2024
ठिकाण :- चिपळूण                                                                                                              मुख्य कार्यकारी अधिकारी

जाहीर आवाहन

केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरण करणेबाबत (KYC Updation)
  1. Risk Categorization : बँकेच्या विदयमान कमी, मध्यम व उच्च (Low, Medium, High Risk)  जोखमीच्या ग्राहकांसाठीच्या केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरणाचा कालावधी अनुक्रमे 10/8/2 वर्षे प्रमाणे, केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहंन करणेत येत आहे.
  2. Inoperative/Dormant Accounts : विदयमान ग्राहकांचे सेव्हिंग व चालू व ठेव खात्यामध्ये सलग 2 वर्षे व्यवहार न झाल्याने  Inoperative/Dormant म्हणुन Mark झालेली खाती KYC Updation करून व खात्यामध्ये व्यवहार करून Operative करून घ्यावीत.
  3. Aadhar Linking : 100% आधार लिंकिंग चे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी संबधीत खातेदारांनी आपले आधार कार्ड नंबर खात्यास लिंक करणे आवश्यक आहे. तरी सबंधित सर्व ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे कि आपण जवळचे शाखेत जाऊन यासंदर्भात माहीती घेऊन योग्य ती पूर्तता करावी.
  4. DEAF Accounts : ग्राहकांनी 10 वर्ष व्यवहार न झाल्याने (Un-claimed Account) DEAF कडे वर्ग झालेल्या खात्यांची यादी बँकेच्या संकेत स्थळावर संबंधित शाखेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आली आहे. तरी अशा ग्राहकांनी सदर खात्यातील रक्कम परत मिळविणेसाठी KYC Updation करून घ्यावी.

KYC संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेबाबत बँकेच्या सर्व शाखानिहाय ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.

सर्व केवायसी पुर्तता न केलेली खाती निष्क्रीय खात्यावंर आम्ही “डेबिट फ्रीझ” लागू करणार आहोत. तपशिल अदयावत करण्याकरीता कृपया  तुमचा मोबाईल/ दूरध्वनी/ इमेल आयडी सादर करावा.ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

कृपया जवळच्या शाखेत जाऊन आपले KYC Updation करून घ्यावी.

दिनांक 01.04.2017 नंतर उघडण्यात आलेल्या व बंद झालेल्या खात्यांचीही केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.

वरील 1 ते 4 कार्यवाहीसाठी बँकेचे व्यवस्थापन संबंधीत ग्राहकांना संर्पक करणेसाठी अनेक बाजुंनी प्रयत्न करत आहे परंतु संबंधीत ग्राहकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदललेमुळे त्यांना संपर्क होऊ शकत नाही.त्यासाठी हे जाहिर आवाहन देण्यात येत आहे.

दि.: 07.06.2024

ठिकाण : चिपळूण                                                                                                                      मुख्य कार्यकारी अधिकारी

This will close in 0 seconds

Scroll to Top
Skip to content