ग्राहक जागरूकता

KYC updation चे नावावर होणाऱ्या फसवणूकीसाठी घ्यावयाच्या काळजीबाबत

-: रिझर्व्ह बँकेचे आवाहन :-

करा (Do’s)  :

  1. खात्याच्या KYC updation साठी कोणतीही विनंती आल्यास, थेट आपल्या बँकेशी संपर्क साधणे.
  2. बँकेचा संपर्क क्रमांक/कस्टमर केअरचा नंबर हा फक्त त्या बँकेच्या अधिकृत वेबसार्इट वरूनच मिळवावा.
  3. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरीत संबंधित बँकेला कळविणे.
  4. खात्याच्या KYC updation साठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची चौकशी संबंधित बँकेच्या शाखेत करणे.
  5. Updation/periodic updation of KYC ची आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांच्या माहितीसाठी रिझर्व्ह बँकेचे दि.25.02.2016 चे Master Direction on KYC (amended from time to time) च्या परिपत्रकातील पॅरा नं. 38 चा अभ्यास करणे.
करू नका (Don’ts) :
 1. खात्याचा लॉगिन आयडी, कार्ड ची माहिती, पिन, पासवर्ड, ओटीपी शेअर करू नये.
 2. केवायसी कागदपत्रे किंवा त्याच्या प्रती अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.
 3. आपला वैयक्तीक संवेदनशील डेटा कोणत्याही अनधिकृत वेबसार्इट किंवा अ‍ॅप वर शेअर करू नका.
 4. मोबाईल किंवा ई-मेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही अनधिकृत लिंक वर क्लिक करू नका.

वार्षिक अहवाल

Scroll to Top
Skip to content