सूचना
केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरण करणेबाबत (KYC Updation)
- Risk Categorization : बँकेच्या विदयमान कमी, मध्यम व उच्च (Low, Medium, High Risk) जोखमीच्या ग्राहकांसाठीच्या केवायसीचे नियतकालिक अदयावतीकरणाचा कालावधी अनुक्रमे 10/8/2 वर्षे प्रमाणे, केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहंन करणेत येत आहे.
- Inpoerative/Dormants Accounts : विदयमान ग्राहकांचे सेव्हिंग व चालू व ठेव खात्यामध्ये सलग 2 वर्षे व्यवहार न झाल्याने Inoperative/Dormant म्हणुन mark झालेली खाती KYC updation करून व खात्यामध्ये व्यवहार करून operative करून घ्यावीत.
- Adhaar Link : 100% आधार लिंकिंग चे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी संबधीत खातेदारांनी आपले आधार कार्ड नंबर खात्यास लिंक करणे आवश्यक आहे. तरी सबंधित सर्व ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे कि आपण जवळचे शाखेत जाऊन यासंदर्भात माहीती घेऊन योग्य ती पूर्तता करावी.
- DEAF Account : ग्राहकांनी 10 वर्ष व्यवहार न झाल्याने (unclaimed amount) DEAF कडे वर्ग झालेल्या खात्यांची यादी बँकेच्या संकेत स्थळावर संबंधित शाखेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करणेत आली आहे. तरी अशा ग्राहकांनी सदर खात्यातील रक्कम परत मिळविणेसाठी KYC updation करून घ्यावी.
KYC संदर्भात RBI च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणेबाबत बँकेच्या सर्व शाखानिहाय ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.
सर्व केवायसी पुर्तता न केलेली खाती निष्क्रीय खात्यावंर आम्ही “डेबिट फ्रीझ” लागू करणार आहोत. तपशिल अदयावत करण्याकरीता कृपया तुमचा मोबाईल/ दूरध्वनी/ इमेल आयडी सादर करावा. ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
कृपया जवळच्या शाखेत जाऊन आपले KYC updation करून घ्यावी.
दिनांक 01.04.2017 नंतर उघडण्यात आलेल्या व बंद झालेल्या खात्यांचीही केवायसी अदयावत करणेसाठी ग्राहकांना आवाहन करणेत येत आहे.
वरील 1 ते 4 कार्यवाहीसाठी बँकेचे व्यवस्थापन संबंधीत ग्राहकांना संर्पक करणेसाठी अनेक बाजुंनी प्रयत्न करत आहे परंतु संबंधीत ग्राहकांचा मोबाईल नंबर, पत्ता बदललेमुळे त्यांना संपर्क होऊ शकत नाही. त्यासाठी हे जाहिर आवाहन देण्यात येत आहे.
ठिकाण : चिपळूण मुख्य कार्यकारी अधिकारी
कर्जदारांसाठी सुचना
रिझर्व्ह बँकेचे दि.18.08.2023 चे Fair Lending Practice – Penal Charges in Loan Accounts चे परिपत्रकान्वये बँकेने दि.01.01.2024 पासून कर्ज खात्यांवर दंड व्याज आकारणे बंद केले आहे.
सभासदांसाठी जाहीर आवाहन
बँकेची 90 वी वार्षिक सर्व साधारण सभा दि. 25.09.2023 रोजी संपन्न झाली आहे. सदर सभेमध्ये बँकेच्या सभासदांना डीव्हीडंड जाहीर करणेत आला आहे. ज्या सभासदांची बँकेमध्ये सेव्हींग अथवा चालू ठेव खाती आहेत त्यांची डीव्हीडंडची रक्कम त्यांचे सेव्हींग अथवा चालू ठेव खाती जमा करणेत आली आहे. परंतू ज्या सभासदांची बँकेमध्ये सेव्हींग अथवा चालू ठेव खाती नाहीत, त्यांची डीव्हीडंडची रक्कम बँकेच्या डीव्हीडंड देणे खाती जमा आहे. तरी अशा सभासदांनी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधून नियमाप्रमाणे आपली KYC कागदपत्रे व इतर बाबींची पुर्तता करून आपले बँकेमध्ये सेव्हींग अथवा चालू ठेव उघडून डीव्हीडंडची रक्कम आपले खात्यामध्ये जमा करून घेऊन बँकेस सहकार्य करावे. सलग 3 वर्षे डीव्हीडंडची रक्कम न घेतल्यास डीव्हीडंड गंगाजळीमध्ये वर्ग करणेत येईल, कृपया याची सभासदांनी नोंद घ्यावी, हि विनंती.
ठिकाण : चिपळूण
मुख्य कार्यकारी अधिकारी
दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँक लि.,चिपळूण
सुधारित लॉकर भाडे
अ. क्र. | लॉकर साईज | नॅनो मेट्रो शहर | मेट्रो पॉलिटन शहर | जुने लॉकर धारक |
१. | लहान | ७००.०० + gst | ९००.०० + gst | ३५०.०० + gst |
२. | मध्यम | १३००.०० + gst | १८००.०० + gst | ४४०.०० + gst |
३. | मोठे | ३०००.०० + gst | ३०००.०० + gst | ६२०.०० + gst |
सूचना :- वरील तकत्यामध्ये नमूद केलेली भाडे वाढ दि. ०१ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होईल.
कर्जदारांना आवाहन
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाप्रमाणे कर्जदारांनी कर्ज खाते बंद केल्यापासून ३० दिवसांमध्ये तारण ठेवलेल्या मालमत्तेची मुळ कागदपत्रे अथवा संबंधित रजिस्ट्रीकडील बोजानोंद कमी करणेसंदर्भातील पत्र संबंधित शाखेमधून घेऊन जाणे. कर्जदार अथवा सह कर्जदार मयत असल्यास त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे कायदेशीर वारसांनी योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा.